https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/pjimage-7-380x214.jpg
आमचा मिहान प्रकल्प पुढच्या वर्षी टेक
ऑफ करणार ... समृद्धी मार्ग आम्हाला सहा तासांत मुंबईशी जोडणार !
आमचे ''नितीन
भौ '' आणून राहिले ना विदर्भात पैशे ... अबब ! किती ? त्यांचे
आकडे समजायला कुठे येतात भाऊ ?
बोन्डआळी प्रश्न ... घोड्यावरून पाहणी
झटपट. झाला निधी मंजूर. तुम्ही करत बसा द्राक्ष पिकाच्या नुकसानीचे
पंचनामे.
विदर्भाच्या पोट्ट्यानी कमाल केली. रणजी क्रिकेट करंडकाच्या
इतिहासात पहिल्यांदा नावलिवलं ना बे !
'अध्यक्ष महाराज', पासष्ठ वर्षांचा ब्याकलॉग भरून काढला आम्ही एका झटक्यात !! अध्यक्ष महाराज हा ब्याकलॉग हे आघाडी सरकारचं पाप होतं. आम्ही ते दोन वर्षात धुऊन काढलं, अध्यक्ष महाराज.
तुमच्या पुण्याच्या आधी आमच्या नागपुरात मेट्रो धावणार ... पुणेकर बापट-चापट ''काकड'' आरतीत दंग.
इ-रिक्षा नागपुरात सुरु देखिल झाल्या.. पतंजलीची संत्रा ज्यूस
फॅक्टरी विदर्भात सुरु होणार. तुम्ही
बसा रोज सकाळी फास - फूस करत. हा तेच ते कपालभारती वगैरे करत.
नाशिकचा एकलहरे विदयुत प्रकल्पाचा धूर कोळश्या अभावी बंद होऊ राहिला. आमच्या सुधीर भाऊंच्या चंद्रपुरात कोळश्याला कमी नाही. तसं आम्हाला कशाचीच कमी नाही म्हणून राहिले की लोक बाप्पा !
कर्जमाफी झाली. सर्वात जास्तीचा आकडा
आमच्या ''यवतमाळ''चाच.
'अध्यक्ष महाराज', वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ, बोबलून राहिले होते तेव्हा ''धोटे'' आणि आता आमचेच ''अणे''.
मी म्हणतो वेगळ्या विदर्भाची गरजच काय राहिली आता बे ? आमची विदर्भ विकासाची एक्सप्रेस सुसाट धावू राहिली ना भौ !
क्राईम-बीईम , खून-बिनाचं बोलू नका राव. मुंबईत तर किड्यामुंग्यासारखे रोज लोक मरू राहिलेत ना. मंग ?
तुम्ही बसा कुटत रडगाणी, तुमच्या
नवऱ्याच्या पहिल्या बायको सारखी. ''माझ्या
नवऱ्याची दुसरी बायको'' सिरिअल
पण जोरात चालू आहे ना बे, भैताडांनो
!!
anilbagul1968@gmail.com











