Tuesday, 11 September 2018

फिर छिडी रात बात फुलोंकी ... रात है या बारात फुलोंकी


गेले चार दिवस हेच गाणं ऐकतोय. यु ट्युब'' वर, पेनड्राईव्ह मधून, मोबाईल मधून, जिथे जिथे शक्य तिथे. किमान चाळीस वेळा ऐकून झालं असेल गेल्या चार दिवसात !

झाडं, फुलं माझ्या आवडीचा विषय. ती घेऊन जातात मला माझ्या बालपणात. नेरळच्या घरात , ''स्वीट कॉटेज'' मध्ये. भोवतालच्या अंगणात. बाजूच्या बागेत. फुलंच फुलं.

पांढऱ्या साध्या तगरी पासून सुरवात, मग पावसात तो रंगेबिरंगी तेरडा ! दाराशेजारी निळ्याशार गोकर्णाचा वेल. जास्वदींची श्रीमंती ... लाल, केशरी , पिवळी, जांभळी, सिंगल, डबल अनेक प्रकार. मग येते क्रदळ ... केळीसारखी पानं आणि त्यातून फुलाची उभी दांडी. पिवळी, केशरी वा लाल रंगाची. सदाफुली आणि गुलबक्षी. दखल घ्या अथवा नाही, फुलायचं थांबायच्या नाहीत.

मग साम्राज्य गुलाब राजाचं. लाल चिनी गुलाबपासून वेलीच्या पांढऱ्या गुलाबापर्यंत ... पण वाटेत भेटायचं लाल चुटुक टपोऱ्या कलमी गुलाबाला, कधी पिवळा जर्द तर कधी गुलाबी !! घराच्या भिंतीजवळ मोगऱ्याची सुगंधी दरवळ. उन्हाळ्यातली प्रत्येक सायंकाळ सुगंधित करणारी ! 

मधूनच डोकंवायची हिरवी गार झिप्री आणि पसरलेला गालिचा दुर्वांचा. दोन्ही माझ्या उपयोगाच्या, २५ पैशाला दुर्वांची जुडी आणि १० रुपयाला झिपरीच्या ३ -४ फांदया, फुलवाला घेऊन जायचा . गुलाब मात्र २ रुपयात ३ - ४ आणि तुळशी २ रुपयात भरपूर ! अरेच्या 'कोंबडा 'राहिला की ! लाल चुटुक तुरेबाज. फुलवाले मागून मागून न्याचे २५ रुपये देऊन. खरी कमाई त्याचीच. श्रावण महिना आणि गणपती हा पीक सिझन !

नाशिकला फुलाची गाठ पडली लग्नानंतर ... बायकोला मोगऱ्याचा गजरा घेऊन देण्यापुरती.

जुनी आवड मग जोपासली आमच्या स्वतःच्या घरात गेल्यावर आणि हो #didt च्या terrace garden च्या निमित्ताने !


फुलके हार फुलके गजरे
शाम फुलोंकी रात फुलोंकी
आपका साथ फुलोंका
आपकी बात बात फुलोंकी !

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...