Monday 13 June 2016

सिंहस्थ पर्वणीचा 'अमृतकुंभ'

गोदातीरी भगव्या संध्याकाळी
कामांध वासनांचा भोग चढतो आहे
आणि उगवणारा प्रत्येक प्रहर
साधु महंतांचा क्रोध झेलतो आहे 


सत्तेच्या दिखाऊ दिवाणखान्यातून
श्रेयवादाचा मद स्त्रवतो आहे
तर, भिक्षुकांच्या बुभुक्षित झोळीला
केवळ दक्षिणेचा मोह होतो आहे 


इच्छुकांच्या निव्वळ स्वप्नभंगातून
फक्त भाकड मत्सर प्रसवतो आहे
अन सिंहस्थ पर्वणीच्या अपूर्व योगासाठी
षडरिपूंचा 'अमृतकुंभ' शिगोशीग भरतो आहे.  


षडरिपूंचा 'अमृतकुंभ' शिगोशीग भरतो आहे.

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...