Thursday 27 September 2018

थोडासा रुमानी हो जाये...


थोडासा रुमानी हो जाये...

रोज मरा कि जिंदगी जिते जिते थोडासा रुमानी हो जाओ, जिंदगी में सकून मिलेगा तुम्हे.

रुमानी होणायसाठी ‘विक्रम सरंजामे’ सारखी प्रेमिका असावीच लागते असं थोडीच आहे ?

रिक्षामधून जातांना प्रेमाचे दोन शब्द बोला त्या ड्रायव्हरशी . बसमधे तिकिटासाठी सुट्टे पैसे राहुद्यात कंडक्टरच्या सुखासाठी. मोलकरणीला आलं घातलेला एक कप चहाचा पुरेसा आहे तिच्या उत्साहासाठी. संसारात भांड्याला भांडे लागण्यानंतर, आमटीचा भुरका मारतांना कौतुकाचे दोन बोल पुरेसे आहेत बायकोला सुखावण्यासाठी.

दो बुंद जिंदगीके जाहीरात करतो अमिताभ पल्स-पोलियो साठी.
मी म्हणतो दोन शब्द प्रेमाचे आयुष्यभराच्या सुखासाठी.

आसपास अनेक वाद विवाद सुरु असतात. भाऊबंदकीपोटी, एकमेकांचे जीव प्यारे होतात.
इथे प्रेमाचे दोन शब्द आले तर? सात बाऱ्यावरचे पोटहिस्से नक्की कमी होतील. हुंड्यापोटीची भांडणं, ऑनर किलिंगचे टोकाचें पाऊल एक घटका विश्रंती घेईल. घरच्या आजारी म्हाताऱ्याला दोन पावलं टाकायला बळ मिळेल. ऑफिस मधले सहकारी जेवतांना टिफिन शेअर करतील. दूर दूर राहणार तरुण मुलगा तुमच्यासाठी भेळपुरी घेऊन येईल.

विश्वास नाही म्हणता ? करून तर बघा.
अहो केलंत तर तुमच्याही आयुष्यात येईल बारीश. सुंदर सस्ती टिकाऊ बारीश ...
नाना पाटेकर म्हणाला तशी ...
हा मेरे दोस्त वहिवाली बारीश
जो आस्मान से आती हैं बुंदो में गाती हैं
ये पानी आख से ढलता हैं तो आसू कहलता हैं
लेकिन चरहरेपे चढ जाता हैं तो रुबाब कहलाता हैं

तो मेरे दोस्तो अभी थोडासा मुस्कुराहो.
यही तो शुरवात है रुमानी होनेकी !

Monday 24 September 2018

तुम्हाला आनंद नेमका केव्हा मिळतो ?



विक्रम सरंजामेने विचारलेला प्रश्न थोड्या वेगळ्या स्वरूपात.

हा विक्रम सरंजामे कोण?ते महत्वाचं नाहीये. प्रश्न महत्वाचा आहे. तुम्हाला आनंद नेमका केव्हा मिळतो ?

मलाच उत्तर विचारताय ?
माझं उत्तर सोप्प आहे. माझ्या ह्या पोस्टला भरपूर सारे (सध्या भरपूर सारे असचं म्हणतात. तुमची डिक्शनरी करेक्ट करून घ्या)हा तर माझ्या ह्या पोस्टला, भरपूर सारे लाईक्स मिळाले कि मला आनंद मिळेल.

हा पण तुम्हाला नेमका आनंद केव्हा मिळतो?
'माझ्या नवऱ्याची दुसरी बायको', सिरिअल सुरु झाली कि आनंद - आय मीन - तो गुज्जूभाई मिळतो, असं उत्तर देऊन माती खाऊ नका.

तुम्हाला खोटं वाटेल, पण हा प्रश्न घेऊन मी अनेकांना भेटलो. हाच प्रश्न त्यांना विचारला.

माझी फ्रेंड रिक्वेस्ट तिनी ऍक्सेप्ट केली कि मला आनंद मिळेल, शुभमचं मत.माझा लिव्ह अप्लिकेशन त्या टकलू बॉस ने सॅंक्शन केला का मंग माला आनंद भेटेल, गल्लीतल्या पक्या उर्फ प्रकाशचं मत.मला किनई मी ऑर्डर केलेला बेबी पिंक प्लाझो मिळेल ना तेव्हा किनई खूप खूप आनंद होणार, कॉफीडे मधल्या तनयाचं म्हणणं.
आमच्या ह्या माहेरी जातात तेव्हा आम्हाला नेहमीच आनंद होतो, जॉगिंग ट्रॅकवर चालता चालता जयंतराव बोलले.
होम वर्क ज्यादिवशी खरे मॅम मागतात त्या दिवशी तावडे काका (विनोद नाही फॅक्ट आहे) शाळेला सुट्टी जाहीर करतात टीव्हीवरून, तेव्हा खूप मोठ्ठा सारा आनंद होतो, सिनिअर केजीतल्या आर्या बडबडली.
माझं पोट सकाळी जेव्हा साफ होतं ना त्यावेळी मला खूप हलकं होऊन आनंद मिळतो, इति दामले आजी.

ही यादी मी अजुन वाढवू शकतो.काय? अहो मी भेटलोच आहे तेव्हढ्या लोकांना.पण शेवटची भेट मी घेतली आणि हादरलो.

इथं मुडदा आला की म्या खुस होतुया. पोस्ट मार्टमला मदत करणाऱ्या सिव्हील हॉस्पिटल मधल्या केरू नानाचे उदगार ! अंगावर काटा आला.‘’चपटी भेटतीया. मंग, वरून चकण्याला थोडंफार ! का ना हुईना आनंद मंग ? दिवाळीच कि आपली मंग !’’

मला भ्या वाटलं. पण ... पण ह्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो आणि ते व्यक्त करू शकतात हे महत्वाचे.

असेही काही लोकं पहिली, अनुभवली, की जे विचारात पडले, आनंद केव्हा होतो ह्या प्रश्नाला सामोरे जातांना.

खरं तर आनंद होणं आणि तो व्यक्त होणं हि खूप नैसर्गिक गोष्ट आहे. पण आजकाल सहज साध्या गोष्टींनाचं तुम्ही आम्ही पारखे झालोत. म्हणून गणपतीत एकत्र आलो तरी पूर्वी सारखे पत्त्याचे कॅट बाहेर येत नाहीत. होळीला पूर्वीसारख्या बोंबाही ठोकल्या जात नाहीत की दसऱ्याला आपट्याची पानही द्यायलाही कुणी महाग होऊन जातं.त्यांचं काय ?

ते जाऊदे तुमचं काय?उत्तर हवंय ह्यावेळी मला तुमच्याकडून ! नुसते कोरडे लाईक्स नकोत !!

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...