5. 55 च्या कर्जत लोकल मधून नेरळच्या
प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गठ्ठे फेकले जायचे. आम्ही ते गोळा करत असू. क्वचित एखादा
पेपर नसायचा. मग 6.30 च्या लोकलने ते यायचे. परशुरामभाऊ
पेपरचे वाटप सुरू करायचे, आपापल्या यादी प्रमाणे घ्यायचे ते
ताब्यात. कुंभारआळी आणि ब्राहणंआळी अशी लाईन होती माझी. अडकवायचे
ते मग सायकलच्या करियरला. पिवळी सीट असलेली हॅमिल्टन होती माझ्याकडे त्यावेळी.
आता सुरू व्हायचा वाटप कार्यक्रम...
ताम्हाणे
लोकसत्ता, दुसाने नवशक्ती... मग सहयोग सोसायटी.. केतकर महाराष्ट्र टाईम्स, नव्हाथे
टाईम्स, खेडकर फ्री प्रेस आणि लोकसत्ता... जवळपास शंभरेक
असायचे पेपर. पुरवणी उशीरा आली तर डबल चक्कर. वाटता वाटता वाचायचे पेपर. माधव
गडकरी आणि गोविंद तळवलकर ह्यांचे अनुक्रमे लोकसत्ता आणि मटा चे अग्रलेख. कधी
नवाकाळ गाजायचा खाडीलकरांच्या लेखणीमुळे तर कधी नवशक्ती , पु.
ग. बेहेरेमुळे!
आकाशवाणीच्या बातम्या सुरू असायच्या कुणाच्या रेडिओवर तर कुठे मराठी भक्तिगीते. सीताकाकू म्हणजे बल्लाळ जोशीच्या आई हमखास द्यायच्या काही खाऊ बाऊ. आणि माझी पटई म्हणजे पटवर्धन काकू, खुप जीव लावायच्या.
ह्या पेपरच्या लाईनमुळे आम्हा कुटुंबाला किती हातभार लागला ह्याची कल्पना आज नाही, पण हा अनुभव मला खूप समृद्ध करून गेला. जगण्यासाठी मोठा आयाम मिळाला हे नक्की!
anilbagul1968@gmail.com

No comments:
Post a Comment