खरं तर मला काही धार्मिक वा राजकीय भाष्य
करायचं नाही. कदाचित तो माझा अधिकार ही नाही. पण स्वच्छ नजरेने टिपलेले, परखड वास्तव, प्रांजळ भावनेने व्यक्त करतो आहे, इतकंच ! प्रतिक्रीयेपोटी वैयक्तिक राग-लोभ, राजकीय वा धार्मिक अभिनावेश नसावा. असो.
सहलीचा आनंद घेताना, नजरेने तिथलं निसर्ग सौंदर्य लुटताना माझं मन नकळत काहीतरी वेगळंच टिपत होतं.
माझं असं क्वचितच होतं. पण इथे ते झालं खरं. कारण जागोजागी दिसणारी मानवनिर्मित
लाल रंगाची उधळण मनाने हलकेच टिपली होती. अगदी नेमकेपणाने ...
हा लाल रंग होता 'विळा कोयता' चिन्ह असणाऱ्या 'कम्युनिस्ट पार्टी'च्या झेंड्याचा. ह्याच काळात केरळात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं
(मार्क्सवादी) अखिल भारतीय अधिवेशन होत होतं. महाराष्ट्रात जसे भगवे फडकतात
जागोजागी, रस्तोरस्ती, तसं तिथे लाल बावटे इतकंच !
पण हे इतकंच नव्हतं, काहीतरी वेगळं होतं. उत्सुकता शिगोशीग वाढू लागली. मग मी एका शोधक नजरेनं
आजूबाजूला पाहू लागलो. तिथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो.
काहीतरी हाताला गवसू पाहत होतं ...
मग रस्त्यावरच्या बंगलेवजा घरं आणि
बागांबरोबरीने मला दिसू लागल्या रस्त्याच्या कडेने उभ्या असणाऱ्या विशिष्ट इमारती.
येशू आणि मदर मेरीचे पुतळे असणाऱ्या, सोबतीला क्रॉस ! साधारणतः दोनशे स्केअर
फुटाचे एकावर एक तीन मजले. 'कप्पेला' म्हणतात त्याला तिथं. ह्या कप्पेलांची संख्या
मात्र लक्षणीय, डोळ्यात भरण्याजोगी. पुण्यात मारुतीच्या देवळांची असावी तशी. पुण्यात पत्र्या
मारुती, तेल्या मारुती, सोन्या मारुती आहेत तसे तिथे सेंट जोसेफ, बिशप, इतकाच फरक.
![]() |
| 'कप्पेला' |
एरवी प्रशस्त, देखण्या अश्या चर्चेसच्या इमारतीत असणारा गॉड
असा रस्त्यावरच्या लहानश्या 'कप्पेला' मध्ये का?
केरळात अनेक वर्षा पासून ख्रिश्चन मिशनरीज
समाजसेवेचं काम करता आहेत. त्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात विदेशी आर्थिक मदत
पुरवली जाते. गरीब, समस्याग्रस्त कुटुंब, विधवा वा परिक्तत्या स्त्रिया ह्यांना गाठून त्यांच प्रबोधन केलं जातं. आर्थिक
मदत केली जाते. साहजिकच 'पोटाला देतो तो देव' ह्या उक्ती नुसार अशी माणसं त्या फादरच्या कह्यात येऊन त्यांच्या धर्माला
आपलंस करतात. होय ही वस्तुस्थिती आहे. समाजाच्या उतरंडीला असणारी माणसं ह्यात
जास्त आहेत. त्यांच्या रोजच्या समस्यांना आधार म्हणून गॉड त्यांच्या जवळ रस्त्यावर. !
ह्यात दोष कुणाचा ?
ह्यात दोष कुणाचा ?
हि झाली धार्मिक बाब. ह्याला राजकीय किनार
देखील आहे.
गेली अनेक वर्षे केरळात डाव्यांची वा
काँग्रेसची आलटून पालटून सत्ता आहे. २६% असणारा मुस्लिम समाज आणि १८% असणारा
ख्रिश्चन समाज हा काँग्रेसचा परंपरागत पाठीराखा. आणि ५५% असणारा हिंदू समाज, 'धर्म हि अफूची गोळी आहे' असं मानणाऱ्या डाव्यांचा अर्थात कम्युनिस्ट
पार्टी ऑफ इंडियाचा (मार्क्सवादी) कडवा समर्थक ! केरळातील हिंदू अतिशय कट्टर
धार्मिक. देवळांची संस्थानं गब्बर श्रीमंत, असं असूनही हे कसं शक्य आहे ?
सध्य स्थितीतील डाव्यांच्या सरकारबद्दल
लोकांना काय वाटतं ?
काँग्रेस सरकार आती है तो बडे बडे घोटाले
होते है ! लेकिन ये लोग रहते है तो करप्शन कम होता है !
होय हे मान्य करावं लागेल जे बघितलं ते. रस्ते साफ - स्वच्छ, रस्ते दुरुस्ती साठी जागोजागी पाहणी चालू होती. महिला सरकारी अधिकारी जातीने
हजार होत्या. कायदा सुव्यवस्था दिसून येत होती. एकंदरीत सुशासन असावं.
असं सगळं असतांना केरळ मधला 'अंडरकरंट' काय होता ?
गेली अनेक वर्षे संघ तिथे काम करतो आहे. अनेक
संघ स्वयंसेवकांच्या हत्या तिथे घडवून आणल्या जातात, तरीही ! भाजपा जागा बनवू पाहत आहे. ५५% हिंदू
व्होट बँक आपलीशी करू पाहत आहे.
इस बार इनको चान्स दे के देखते हें ! असं
त्या व्होट ब्यांकेत शिजतं आहे . कुणी सांगावं 'त्रिपुरा' सारखं होईल देखील.
पण… पण सर्वात सुशिक्षित राज्य असा लौकिक
असणाऱ्या राज्यात धार्मिकतेवर मत विभागणी होत असेल तर, उद्या जेएनयूमध्ये ब्य.जीनांचा पुतळा उभारला गेला तर नवल ते काय ?
anilbagul1968@gmail.com


No comments:
Post a Comment