
सलमान खान मला अजिबात (मा. मु. शब्द बिलकुल) आवडत नाही.माझ्या काही घट्ट मैत्रिणी त्याच्या डाय-हार्ट
फ्यान आहेत हा भाग अलाहिदा !
झालं काय कि माझं ऑफिस आहे एका मल्टिफ्लेक्स थिएटरच्या अगदी वर.पिक्चर सुटल्यावर खालून जाणाऱ्या
गर्दीवरून मला हिट- फ्लॉप लगेच कळते.
तर आज सायंकाळी पाहिलं तर तोबा गर्दी !
सल्लूचा रेस ३ हिट !! मन खट्टू झालं.घरी येता येता आभाळ भरून आलं होतं. आणि मग
झिम्माड पाऊस जोरदार बरसून गेला. परवाच्या
शिखर धवनच्या खेळीसारखा,
छान सुखावून गेला.
पाऊस पडला कि तुम्हाला काय आठवतं ?खुसखुशीत कांदा भजी आणि वाफाळलेला चहा ...
उत्तर अगदी बरोबर ... पण ..पण मला त्याच्या बरोबरीने याद येते मौसमीची !
हो तीच ती ... मंझिल मध्ये अमितदा बरोबर, मुंबईच्या
रस्त्यावर, आझाद मैदानापासून नरिमन पॉईंट पर्यन्त हातात हात घालत गात फिरते ...
तेच ते तुमचं आमचं आवडतं गाणं गुणगुणत....
रिमझिरे गिरे सावन ... सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसम में लगी कैसे ये आगनझिम्माड पावसात निरागस मन कसं प्रफुल्लित होतं ...अगदी मौसमीच्या गालावरच्या गोड गोड
खळ्यांसारखं !!रिमझिरे गिरे सावन ...
anilbagul1968@gmail.com
सलमान खान मला अजिबात (मा. मु. शब्द बिलकुल) आवडत नाही.माझ्या काही घट्ट मैत्रिणी त्याच्या डाय-हार्ट
फ्यान आहेत हा भाग अलाहिदा !
झालं काय कि माझं ऑफिस आहे एका मल्टिफ्लेक्स थिएटरच्या अगदी वर.पिक्चर सुटल्यावर खालून जाणाऱ्या गर्दीवरून मला हिट- फ्लॉप लगेच कळते.
तर आज सायंकाळी पाहिलं तर तोबा गर्दी ! सल्लूचा रेस ३ हिट !! मन खट्टू झालं.घरी येता येता आभाळ भरून आलं होतं. आणि मग झिम्माड पाऊस जोरदार बरसून गेला. परवाच्या शिखर धवनच्या खेळीसारखा, छान सुखावून गेला.
पाऊस पडला कि तुम्हाला काय आठवतं ?खुसखुशीत कांदा भजी आणि वाफाळलेला चहा ...
उत्तर अगदी बरोबर ... पण ..पण मला त्याच्या बरोबरीने याद येते मौसमीची !
हो तीच ती ... मंझिल मध्ये अमितदा बरोबर, मुंबईच्या रस्त्यावर, आझाद मैदानापासून नरिमन पॉईंट पर्यन्त हातात हात घालत गात फिरते ...
तेच ते तुमचं आमचं आवडतं गाणं गुणगुणत....
रिमझिरे गिरे सावन ... सुलग सुलग जाये मन भिगे आज इस मौसम में लगी कैसे ये आगनझिम्माड पावसात निरागस मन कसं प्रफुल्लित होतं ...अगदी मौसमीच्या गालावरच्या गोड गोड खळ्यांसारखं !!रिमझिरे गिरे सावन ...
anilbagul1968@gmail.com
No comments:
Post a Comment