Showing posts with label मुशाफिरी. Show all posts
Showing posts with label मुशाफिरी. Show all posts

Tuesday 11 September 2018

फिर छिडी रात बात फुलोंकी ... रात है या बारात फुलोंकी


गेले चार दिवस हेच गाणं ऐकतोय. यु ट्युब'' वर, पेनड्राईव्ह मधून, मोबाईल मधून, जिथे जिथे शक्य तिथे. किमान चाळीस वेळा ऐकून झालं असेल गेल्या चार दिवसात !

झाडं, फुलं माझ्या आवडीचा विषय. ती घेऊन जातात मला माझ्या बालपणात. नेरळच्या घरात , ''स्वीट कॉटेज'' मध्ये. भोवतालच्या अंगणात. बाजूच्या बागेत. फुलंच फुलं.

पांढऱ्या साध्या तगरी पासून सुरवात, मग पावसात तो रंगेबिरंगी तेरडा ! दाराशेजारी निळ्याशार गोकर्णाचा वेल. जास्वदींची श्रीमंती ... लाल, केशरी , पिवळी, जांभळी, सिंगल, डबल अनेक प्रकार. मग येते क्रदळ ... केळीसारखी पानं आणि त्यातून फुलाची उभी दांडी. पिवळी, केशरी वा लाल रंगाची. सदाफुली आणि गुलबक्षी. दखल घ्या अथवा नाही, फुलायचं थांबायच्या नाहीत.

मग साम्राज्य गुलाब राजाचं. लाल चिनी गुलाबपासून वेलीच्या पांढऱ्या गुलाबापर्यंत ... पण वाटेत भेटायचं लाल चुटुक टपोऱ्या कलमी गुलाबाला, कधी पिवळा जर्द तर कधी गुलाबी !! घराच्या भिंतीजवळ मोगऱ्याची सुगंधी दरवळ. उन्हाळ्यातली प्रत्येक सायंकाळ सुगंधित करणारी ! 

मधूनच डोकंवायची हिरवी गार झिप्री आणि पसरलेला गालिचा दुर्वांचा. दोन्ही माझ्या उपयोगाच्या, २५ पैशाला दुर्वांची जुडी आणि १० रुपयाला झिपरीच्या ३ -४ फांदया, फुलवाला घेऊन जायचा . गुलाब मात्र २ रुपयात ३ - ४ आणि तुळशी २ रुपयात भरपूर ! अरेच्या 'कोंबडा 'राहिला की ! लाल चुटुक तुरेबाज. फुलवाले मागून मागून न्याचे २५ रुपये देऊन. खरी कमाई त्याचीच. श्रावण महिना आणि गणपती हा पीक सिझन !

नाशिकला फुलाची गाठ पडली लग्नानंतर ... बायकोला मोगऱ्याचा गजरा घेऊन देण्यापुरती.

जुनी आवड मग जोपासली आमच्या स्वतःच्या घरात गेल्यावर आणि हो #didt च्या terrace garden च्या निमित्ताने !


फुलके हार फुलके गजरे
शाम फुलोंकी रात फुलोंकी
आपका साथ फुलोंका
आपकी बात बात फुलोंकी !

anilbagul1968@gmail.com

माझी पेपरची लाईन आणि बरंच काही...


5. 55 च्या कर्जत लोकल मधून नेरळच्या प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर गठ्ठे फेकले जायचे. आम्ही ते गोळा करत असू. क्वचित एखादा पेपर नसायचा. मग 6.30 च्या लोकलने ते यायचे. परशुरामभाऊ पेपरचे वाटप सुरू करायचे, आपापल्या यादी प्रमाणे घ्यायचे ते ताब्यात. कुंभारआळी आणि ब्राहणंआळी अशी लाईन होती माझी. अडकवायचे ते मग सायकलच्या करियरला. पिवळी सीट असलेली हॅमिल्टन होती माझ्याकडे त्यावेळी. 



आता सुरू व्हायचा वाटप कार्यक्रम...

ताम्हाणे लोकसत्ता, दुसाने नवशक्ती... मग सहयोग सोसायटी.. केतकर महाराष्ट्र टाईम्स, नव्हाथे टाईम्स, खेडकर फ्री प्रेस आणि लोकसत्ता... जवळपास शंभरेक असायचे पेपर. पुरवणी उशीरा आली तर डबल चक्कर. वाटता वाटता वाचायचे पेपर. माधव गडकरी आणि गोविंद तळवलकर ह्यांचे अनुक्रमे लोकसत्ता आणि मटा चे अग्रलेख. कधी नवाकाळ गाजायचा खाडीलकरांच्या लेखणीमुळे तर कधी नवशक्ती , पु. ग. बेहेरेमुळे! 

आकाशवाणीच्या बातम्या सुरू असायच्या कुणाच्या रेडिओवर तर कुठे मराठी भक्तिगीते. सीताकाकू म्हणजे बल्लाळ जोशीच्या आई हमखास द्यायच्या काही खाऊ बाऊ. आणि माझी पटई म्हणजे पटवर्धन काकू, खुप जीव लावायच्या. 

ह्या पेपरच्या लाईनमुळे आम्हा कुटुंबाला किती हातभार लागला ह्याची कल्पना आज नाही, पण हा अनुभव मला खूप समृद्ध करून गेला. जगण्यासाठी मोठा आयाम मिळाला हे नक्की!

anilbagul1968@gmail.com




देवभूमी केरळ, आणि केरळ मधला 'अंडरकरंट' !! (भाग दोन)



खरं तर मला काही धार्मिक वा राजकीय भाष्य करायचं नाही. कदाचित तो माझा अधिकार ही नाही. पण स्वच्छ नजरेने टिपलेले, परखड वास्तव, प्रांजळ भावनेने व्यक्त करतो आहे, इतकंच ! प्रतिक्रीयेपोटी वैयक्तिक राग-लोभ, राजकीय वा धार्मिक अभिनावेश नसावा. असो.
सहलीचा आनंद घेताना, नजरेने तिथलं निसर्ग सौंदर्य लुटताना माझं मन नकळत काहीतरी वेगळंच टिपत होतं. माझं असं क्वचितच होतं. पण इथे ते झालं खरं. कारण जागोजागी दिसणारी मानवनिर्मित लाल रंगाची उधळण मनाने हलकेच टिपली होती. अगदी नेमकेपणाने ...

हा लाल रंग होता 'विळा कोयता' चिन्ह असणाऱ्या 'कम्युनिस्ट पार्टी'च्या झेंड्याचा. ह्याच काळात केरळात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचं (मार्क्सवादी) अखिल भारतीय अधिवेशन होत होतं. महाराष्ट्रात जसे भगवे फडकतात जागोजागी, रस्तोरस्ती, तसं तिथे लाल बावटे इतकंच !
पण हे इतकंच नव्हतं, काहीतरी वेगळं होतं. उत्सुकता शिगोशीग वाढू लागली. मग मी एका शोधक नजरेनं आजूबाजूला पाहू लागलो. तिथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करू लागलो. काहीतरी हाताला गवसू पाहत होतं ...
मग रस्त्यावरच्या बंगलेवजा घरं आणि बागांबरोबरीने मला दिसू लागल्या रस्त्याच्या कडेने उभ्या असणाऱ्या विशिष्ट इमारती. येशू आणि मदर मेरीचे पुतळे असणाऱ्या, सोबतीला क्रॉस ! साधारणतः दोनशे स्केअर फुटाचे एकावर एक तीन मजले. 'कप्पेला' म्हणतात त्याला तिथं. ह्या कप्पेलांची संख्या मात्र लक्षणीय, डोळ्यात भरण्याजोगी. पुण्यात मारुतीच्या देवळांची असावी तशी. पुण्यात पत्र्या मारुती, तेल्या मारुती, सोन्या मारुती आहेत तसे तिथे सेंट जोसेफ, बिशप, इतकाच फरक.

'कप्पेला'

एरवी प्रशस्त, देखण्या अश्या चर्चेसच्या इमारतीत असणारा गॉड असा रस्त्यावरच्या लहानश्या 'कप्पेला' मध्ये का?
केरळात अनेक वर्षा पासून ख्रिश्चन मिशनरीज समाजसेवेचं काम करता आहेत. त्यासाठी त्यांना प्रचंड प्रमाणात विदेशी आर्थिक मदत पुरवली जाते. गरीब, समस्याग्रस्त कुटुंब, विधवा वा परिक्तत्या स्त्रिया ह्यांना गाठून त्यांच प्रबोधन केलं जातं. आर्थिक मदत केली जाते. साहजिकच 'पोटाला देतो तो देव' ह्या उक्ती नुसार अशी माणसं त्या फादरच्या कह्यात येऊन त्यांच्या धर्माला आपलंस करतात. होय ही वस्तुस्थिती आहे. समाजाच्या उतरंडीला असणारी माणसं ह्यात जास्त आहेत. त्यांच्या रोजच्या समस्यांना आधार म्हणून गॉड त्यांच्या जवळ रस्त्यावर. !
ह्यात दोष कुणाचा ?

हि झाली धार्मिक बाब. ह्याला राजकीय किनार देखील आहे.
गेली अनेक वर्षे केरळात डाव्यांची वा काँग्रेसची आलटून पालटून सत्ता आहे. २६% असणारा मुस्लिम समाज आणि १८% असणारा ख्रिश्चन समाज हा काँग्रेसचा परंपरागत पाठीराखा. आणि ५५% असणारा हिंदू समाज, 'धर्म हि अफूची गोळी आहे' असं मानणाऱ्या डाव्यांचा अर्थात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा (मार्क्सवादी) कडवा समर्थक ! केरळातील हिंदू अतिशय कट्टर धार्मिक. देवळांची संस्थानं गब्बर श्रीमंत, असं असूनही हे कसं शक्य आहे ?
सध्य स्थितीतील डाव्यांच्या सरकारबद्दल लोकांना काय वाटतं ?

काँग्रेस सरकार आती है तो बडे बडे घोटाले होते है ! लेकिन ये लोग रहते है तो करप्शन कम होता है !
होय हे मान्य करावं लागेल जे बघितलं ते. रस्ते साफ - स्वच्छ, रस्ते दुरुस्ती साठी जागोजागी पाहणी चालू होती. महिला सरकारी अधिकारी जातीने हजार होत्या. कायदा सुव्यवस्था दिसून येत होती. एकंदरीत सुशासन असावं.
असं सगळं असतांना केरळ मधला 'अंडरकरंट' काय होता ?

गेली अनेक वर्षे संघ तिथे काम करतो आहे. अनेक संघ स्वयंसेवकांच्या हत्या तिथे घडवून आणल्या जातात, तरीही ! भाजपा जागा बनवू पाहत आहे. ५५% हिंदू व्होट बँक आपलीशी करू पाहत आहे.

इस बार इनको चान्स दे के देखते हें ! असं त्या व्होट ब्यांकेत शिजतं आहे . कुणी सांगावं 'त्रिपुरा' सारखं होईल देखील.

पणपण सर्वात सुशिक्षित राज्य असा लौकिक असणाऱ्या राज्यात धार्मिकतेवर मत विभागणी होत असेल तर, उद्या जेएनयूमध्ये ब्य.जीनांचा पुतळा उभारला गेला तर नवल ते काय ?

anilbagul1968@gmail.com




देवभूमी केरळ, आणि केरळ मधला 'अंडरकरंट' !! (भाग एक)


पूर्वी म्हणजे गोऱ्या साहेबांचं राज्य असतांना, साहेबांना हिंदुस्तानातला उन्हाळा सहन होत नसे. म्हणून त्यांनी इथं उन्हाळ्यात देखिल थंड राहणारी ठिकाणं शोधली. तिथं सोयीसुविधा तयार केल्या. गोरा साहेब मग उन्हाळ्याच्या दिवसात तिथे जाऊन राहू लागला. आपला देश स्वतंत्र झाल्यावर,  गोऱ्यांची गरजेपोटी पडलेली हि प्रथा, आपण 'उन्हाळी पर्यटना'च्या नावे जपली. पर्यटन कंपन्यांमुळे  ही 'टूम ' चांगलीच  फोफावली. असो.


आम्ही देखिल नाशकातला प्रचंड उकाडा असह्य होऊन 'देवभूमी केरळ'ची सफर करून आलो. कोचीन, मुनार, कुमारकम, वरकला आणि तिरुअनंतपुरम असा सहा दिवसांचा दौरा होता, उत्तर केरळ ते दक्षिण केरळ ! मी माझी पत्नी मनिषा, मुलगा स्वराज आणि भाचा शंतनू असे प्रवासी
.



मुनार - टेकडीवरी चहाचे हिरवेगारमळे


मुनार म्हणजे केरळ मधील थंड हवेचं ठिकाण. समुद्रसपाटीपासून ५७०० मीटर वर. उंच उंच डोंगर, माथ्यावर हिरवा शालू लपेटल्यागत गर्द वनराईने नटलेले. मधूनच चहाचे मळे. भर उन्हाळ्यात १८ - २० डिग्री तापमान, कधी मधी पावसाच्या हलकेशा सरी ! मग ढगांचा पिंजलेला कापूस त्या डोंगर कड्यांवर खुळ्यागत रेंगाळलेला. सारं कसं शांत शांत .... घड्याळ्यातले काटे फिरवणारा, गडबड-गोंधळ अजिबात नाही. प्रदूषणाचा मागमूस नाही. निसर्गाच्या प्रसन्न पाऊलखुणा अवतीभवती. व्वा क्या बात है !!

दोन दिवसातल्या मुक्कामात भरभरून घेतला 'ऑक्सिजन' वर्षभराच्या भागदौडीला पुरेलसा ! सोबत चार-सहा फोटो, आठवणींच्या ठेव्याला लागतील म्हणूनसे !!

तिसऱ्या दिवशी सकाळी पोटभर न्याहारी करून निघालो 'कुमारकम'च्या दिशेने ... चार तासाचा मोटारीचा प्रवास.

हा प्रवास कमी अंतराचा , पण छोटया रस्त्यांमुळे जास्त वेळ घेणारा. रस्ते अरुंदच पण नेटके, साफ-स्वच्छ. मग आपण कंटाळत नाही इथं. रस्त्यावरची सगळीच वाहने जात राहतात शांतपणे, पोहोचायची कसलीच घाई नसल्यासारखी. कर्कश हॉर्न नाही, जीवघेणे ओव्हरटेक नाहीत. हा प्रवास आपल्याला आदिमाली, मथीरापिल्लै, कालुकडं, कालापुरा, पुत्थुपड्य, असा केरळच्या ग्राम्य भागातून, घेऊन जातो. मोटारीच्या काचेतून आपल्या डोळ्यांना दिसत राहतं, जुन्या कौलारू बंगलेवजा बैठ्या घरांचं दर्शन. घराच्या दर्शनी भागात रंगेबिरंगी फुलांची बाग, पोटच्या पोराच्या काळजीसारखी निगुतीने सांभाळलेली ! जुन्या कौलारू छताला गेरूचा हात दिलेला. घराला टुमदार गेट, त्यावर हौसेनी लावलेली छानशी पाटी.


हाउस बोट  - कुमारकम 


कुमारकम हा 'वेम्बनंद' ह्या प्रशस्त लेकच्या  ब्याकवॉटरचा भाग. इथं पूर्ण दिवसाचा मुक्काम हाऊसबोटमध्ये, इंद्रप्रस्थम नावं होतं तिचं. तर आमची ही इंद्रप्रस्थम अगदी लांबलचक, तीन बेडरूम्स, किचन -डायनींग. वरचा मजला खास दर्शनी ग्यालरी सारखा. चहा -कॉफी, नास्ता, दोन वेळेचं जेवण -खास केरळीयन पद्धतीचं. ताजे ताजे मासे मायंदाळ. दिमतीला गोपी नावाचा सेवक. तोडकं मोडकं इंग्रजी समजू-बोलू शकणारा.  त्याच बरोबर खानसामा, हाऊसबोटीचा चालक अन त्याचा जोडीदार अशी 'इंद्रप्रस्थम'ची आमची टीम. दिवसभर शांतशा पाण्यातून सैर. सोबतीला अनेकविध पक्षी जसे की खंड्या, वूडपेकर, घारी, आणि बदकं देखिल. जेवणं ,आटोपल्यावर गाण्याच्या भेंड्या आणि पत्ते.  रात्री चांदण्या मोजता मोजता झोप कधी लागली कळलीच नाही. सकाळी चहा घेऊन गोपी आला त्यावेळी जाग आलेली.


ब्लुवॉटर बीच रिसॉर्ट


आजचा चौथा दिवस.  'ब्लुवॉटर बीच रिसॉर्ट', वारकला बीच हा पुढचे दोन दिवस आमचा पत्ता असणार होता. नावात बीच असलं तरी इथे बीच नावालाच. खरा बीच इथून चार मैलावर. हा पण वॉटर मात्र अगदी ब्लु, नावाप्रमाणे निळंशार ! स्वच्छ !! मिनी गोवा समजलं जाणारा वारकाला बीच तसा हटकेच डेस्टिनेशन. खरी गर्दी फिरंग्यांची ! गोव्यातल्या गर्दीला कंटाळून शांतपणा शोधायला आलेली.


आजची केरळ मधली शेवटची रात्र थेट राजधानीत, तिरुअनंतपुरम मध्ये. दुसऱ्या दिवशी परतीचा प्रवास. इथली फिरण्याची सुरुवात देवदर्शनानं (?) करायची ठरली. प्रश्नचिन्ह कशासाठी ते माझ्या जवळच्याना माहीत असणार आहे. भर उन्हात अनवाणी चटके खात पोहचलो देवाच्या दारी. पण हाय रे कर्मा. देवाची विश्रांतीची वेळ ... दरवाजे त्यामुळे नव्हते उघडलेले ... 'देऊळबंद' अशीच स्थिती ! मग निघालो चौर्यांशी लक्ष योनीतील काही खास प्राण्यांना भेटायला ... प्राणी संग्रालयात. रंगीबेरंगी वेगवेगळ्या जातीचे पोपट, पांढरे मोर, काकाकुवा, हरणं, तरस, भेकरं, मगरी, ऐसपैस पाणघोडे, रानगवे आणि शेवटी बिबट्या, पांढरे वाघ, पट्टेरी राजबिंडे वाघवाघिण जोडी आणि जंगलाचा राजा - रुबाबदार सिंह. त्या पिंजऱ्यात कैद असणारा राजा नावाप्रमाणे वागलेला पाहिला. सेल्फीच्या वेडानी झपाटलेली काही कार्टी त्याच्या पिंजऱ्यापुढे हल्लागुल्ला करत फोटोसेशन करत होते. वैतागलेल्या त्या राजाने अशी काही गर्जना केली की ती कार्टी पाय घेउन फर्लांगभर पळाली.

सहावा दिवस. सकाळपासून निघायच्या तयारीची लगबग. स्विमिंग पुलातून मुलांचा पाय निघत नव्हता. मोठ्या मीनतवारीने बायकोने त्यांना बाहेर काढले. यावरून सावरून एकदाचे निघालो देवभूमी केरळ सोडून ... नाशिकच्या दिशेने !

anilbagul1968@gmail.com

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...