Friday 25 December 2020

जामतारा: सबका नंबर आयेगा

ऑगस्ट २०१९, सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास, सौ. प्रेनित कौर ह्यांच्या मोबाईलवर कॉल येतो. तो कॉल स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरने केलेला असतो.

''मॅडमजी, आपके सॅलरीके तेवीस लाख अकाउंटमे जमा करणे है, प्लिज आप यहा आके प्रोसेस करे. तीन तारीख तक जमा नही किये तो वो अमाऊंट लॅप्स हो जायेगी.''

मॅडम थोड्याश्या गड़बड्तात. काय करावं त्यांना सुचत नाही.

''मॅडमजी, आपको आना पॉसिबल नही है, तो कोई बात नही. आपकी तरफसे मै जमा करवता हूं!''

मॅडमना हायसं वाटतं. चला आपले तेवीस लाख वाचले.

''मॅडमजी, आप सिर्फ बँक डिटेल्स दिजियेगा, और आपके मोबाइलपे ओटीपी आयेगा, उतना प्लिज शेअर करियेगा.

मॅडमजी, पुढच्या मिनिटात सगळे डिटेल्स देतात, पाठोपाठ मोबाईलवर आलेला ओटीपीही देऊन मोकळ्या होतात.

पुढच्या दोन मिनिटात त्यांच्या मोबाईलवर मेसेज फ्लॅश होतो. अकाऊंटमधून तेवीस लाख ट्रान्स्फर झाल्याचा. 

मॅडम हादरतात. त्या लगेच आपल्या पतीला फोन करून घडलेला प्रकार सांगतात. लागलीच पंजाबच्या पोलीस महा संचालकांना कळविण्यात येते. आणि पंजाब पोलिसांची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागते. कारण...

ह्या मॅडमजी असतात पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग ह्याच्या पत्नी.

चक्क एका राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या पत्नीला तेवीस लाखाचा चुना लागलेला असतो. तो ही चार मिनिटांच्या एका मोबाईल कॉलच्या संभाषणातून.

आणि तो कॉल, स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दिल्लीतल्या जनकपूर शाखेच्या मॅनेजरने केलेला नसतो. तो कॉल केला असतो, अताउल अन्सारीने, ‘जामताराहून!

जामतारा - हे गावं, म्हणजे झारखंड मधील जिल्ह्याचं ठिकाण. नव्वद हजार लोकवस्ती असलेलं. फिशिंग कॅपिटल ऑफ इंडिया अशी ह्याची ओळख



कर्मतार, असंच ह्या जिल्ह्यातलं छोटंसं गावं. त्याचा रेल्वेस्टेशनचं नाव - ईश्वरचंद्र विद्यासागर स्थानक. थोर समाजसुधारक, ईश्वरचंद्र विद्यासागर ह्याचं ह्या गावात वास्तव्य होतं. इथल्या आदिवासी मुलांना शिक्षण द्यायचं काम ते करत असत. आदिवासी पाड्यांवर औषध वाटपाचं काम देखील ते करायचे.

एप्रिल २०१५ ते मार्च २०१७ ह्या कालावधीत १२ राज्यांचे पोलीस २३ वेळा कर्मतार’, गावात तपासासाठी येऊन गेले. एकूण ३८ आरोपींना अटक झाली. एकूण ८० केसेस ह्या काळात रजिस्टर झाल्यात, ३३० आरोपींविरोधात. एकूण अटक झालेल्याची संख्या आता शंभरच्या वर गेली आहे

जामतारा ते कर्मातर हा रेल्वेला समांतर असणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे दिसतील तुम्हाला. ह्या १७ किलोमीटर रस्त्यावर आणि आजूबाजूला विकासाची कोणतीच खूण सापडणार नाही, डझनभर मोबाईल टॉवर सोडून. सर्व प्रमुख बँकांचे कार्यालय, टू व्हीलर, फोर व्हीलर गाड्यांचे शोरूम्स, मोबाईल कंपन्यांचे शोरूम्स मात्र इथं आहेत.



इथल्या पोलीस स्टेशनच्या आवारात तुम्हाला दिसतील नव्याकोऱ्या SUV गाड्या, अनेक मोटारबाईक्स, 70 LED मॉनिटर्स, एअर कंडिशनर्स, १२ रेफ्रिजरेटर्स, २०० मोबाईल हॅंडसेट्स, फेक आयडेंटिटीचे हजारो सिम कार्ड्स, वॉशिंग मशिन्स ४० एटीएम कार्ड्स ८० बँक पासबुक, नऊ लक्ष कॅश, सोफे आणि बरंच काही. पोलीस तपासात   आरोपींकडून जप्त झालेल्या ह्या सगल्या वस्तू.

सू मोटोकायद्याखाली शेकडो सायबर क्राईमच्या केसेस दाखल आहेत. बहुतेक केसेस मध्ये सेक्शन ४१९, ४२० ही चीटिंगची कलमे, ४६८ ४७१ ही दरोड्याची कलमे आणि ६६ , ६६ ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्टची कलमे लावलेली आहेत.

जया रॉय, सुपरिटेंडंट ऑफ पोलीस (एस पी) सांगतात, काही वर्षांपूर्वी इथली काही तरुण मंडळी कामाकरिता बाहेर शहरात गेली होती. त्यावेळी त्यांनी मोबाईल रिचार्जचे तंत्र शिकून घेतले, तेही एक रुपया खर्च करता रिचार्ज. मग त्यांनी दुसऱ्यांच्या बँक अकाउंट मधून पैसे नेट बँकिंग द्वारे काढायचे तंत्र आत्मसात केले.

ह्यांची मोडस ऑपरेंडी काय असते?

इथले बेकार तरुण पहिले फेक आयडेडिटी वापरून मोबाईलचे सिम कार्ड्स गोळा करतात. संपूर्ण सीरीज मिळवायची मोबाईल नंबरची. मग हजारो एटीएम धारकांना फोन करायचे. बँकेतून बोलत असल्याचा आव आणून, लोकांना बोलत बोलत जाळ्यात ओढायचं. त्यांच्याकडून त्यांच्या अकाउंट्सची सगळी माहिती, अकाउंट नंबर, आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर, नेट बँकिंग आयडी, पासवर्ड सगळं मिळवता मिळवता, एटीएम पिन विचारायचा.

त्या सगळ्या नंबर्सवर, बँक अकाऊंट लिंक आहेत का ते चेक करायचे. अकाऊंट लिंकिंग असल्याचे सापडले तर लॉग इन करायचे.

कधी ते सांगतात एटी एम पिन कुणाला सांगायचा नसतो. आम्ही तुम्हाला बँकेतून ओटीपी पाठवला आहे तो फक्त कन्फर्म करा. तो कन्फर्म केला गेला कि ट्रान्झॅक्शन कम्प्लिट.

कधी त्या नंबरवर कॉल करायचा. कस्टमर केअर मधून केल्यासारखा. अपग्रेड सीम फ्री ची ऑफर द्यायची. त्यासाठी केवायसी डिटेल्स लागत असल्याचे सांगायचे. त्याचा विश्वास संपादन करायचा, आपण कसे तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेची काळजी घेतो, वगैरे वगैरे बोलून. मग त्याचा इमेल आयडी मिळवायचा. मग पुढची स्टेप

कधी कस्टमर केअरवरून पाठवल्यासारखे भासवत व्हिक्टीमला मेल करायचा, त्याच्या अकाऊंटला रजिस्टर असलेल्या इमेल वरती. त्याचा मोबाईल इमेलला लिंक करण्यास सांगायचे. मग त्याला त्याच्या मोबाईलवर मेसेज टाकून त्याचे सिम, सिम मध्ये कन्व्हर्ट करायला लावायचे. मग तुमच्याकडे त्याच्या अकाउंटचा पूर्ण कंट्रोल येतो.

मग ग्राहकाच्या खिशातले पैसे परस्पर वळवले जातात. फसवून ट्रान्स्फर केलेले पैसे एका वॅलेट वर वळवले जातात. तिथून मग पाच सहा वॅलेट वर ट्रान्स्फर केले जातात. आणि शेवटी त्या सगळ्या वॅलेट वरून विशिष्ट बँक अकाउंट मध्ये फिरवले जातात. इथल्या घराघरातून रोज असे फिशिंग कॉल्स केले जातात. रोजच्या आउट गोइंग कॉल्सची संख्याच सरासरी तीन हजार इतकी असते.

हे टीमवर्क वर चालतं. सकाळी उठून हे सगळे तरुण इथल्या बांबूच्या रानात निघतात. दोन दोन लोकांची टीम. एक बनावट सिमवरून फोन कॉल करणारा. त्याच्याशेजारी दुसरा बसलेला असतो स्मार्ट फोन घेऊन. एखाद्या कॉमर्स शॉपिंग साईटवर वर तो लॉगिन असतो. प्रोसिड टू मेक पेमेंट वर पार्टनर एका कस्टमरच्या बँक अकाउंटचे डिटेल्स त्याला देतो मग पहिला ते डिटेल्स वापरून शॉपिंगची पेमेंट प्रोसेस कम्प्लिट करतो. दुसरा ते पेमेंट सिक्युअर करतो शॉपिंग पूर्ण होते. लगेचच सिम काढून नष्ट केले जाते.

वर उल्लेख केलेल्या सौ. प्रेनित कौर, ह्या एकट्याच हाय प्रोफाइल व्हिक्टीम नाहीत. केरळचा एक खासदार हि एक लाखाला ठकवला गेला आहे. बंगालच्या एका मंत्र्याला चार लाखाचा चुना लागला आहे. दस्तरखुद्द, अमिताभजी पाच लाख गमावून बसलेत.

त्यामुळे जामतारा फिशिंग’, सगळीकडे गाजू लागलंय. जानेवारीच्या सुमारास ह्या सगळ्या गोरखधंद्यावर एक वेब सिरीज देखील येऊन गेलीय. ‘जमतारा -सबका नंबर आयेगा.’

तुम्हारा कब आयेगा? पुढच्या वेळी असे फिशी कॉल तुम्हाला सहज ओळखता येतील. जर तुम्हाला बॅकग्राउंडला बांबूच्या पानांची सळसळ किंवा विद्यासागर रेल्वे स्टेनजवळच्या एखाद्या ट्रेनची शिट्टी ऐकू ली तर समजा

'जामताराला' तुमचा ही नंबर लागलाय!

anilbagul1968@gmail.com

 

 

Thursday 17 September 2020

माही वे - अनटोल्ड स्टोरी

 


साधारणतः चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. मी दुबईतल्या भावाकडे गेलो होतो.

एके दिवशी, माझ्या पुतणीशी छान गप्पा सुरु होत्या क्रिकेटवरून.

तिने मला विचारले तुला कोणता क्रिकेटर आवडतो ?

मी म्हणालो लेडीज फर्स्ट ! तूच सांग.

ती लगेच उत्तरली नो डाउट, सचिन !!

हं काका आता तू सांग ? मीही लगेच उत्तरलो नो डाउट, धोनी !!

तिला खूपच आश्चर्य वाटले.

धोनी नुकताच उदयाला आला होता. गांगुली अजूनही कप्तान होता.

धोनी युग सुरु व्हायचं होत. मग ह्याला धोनी इतका का आवडतो.

तिने मला कारण विचारले.

मी लगेच यादी दिली, बायको मला जशी किराणा आणण्यासाठी देते तशी.

धोनी ७ नंबर टीशर्ट वापरतो. माझी बर्थडेट ही ७ आहे.

तो विकेटकिपर आहे, मी पण माझ्या लहानपणी विकेटकिपरच होतो.

तो रांची सारख्या निमशहरी भागातून आला मी पण.

त्याच्या डोक्यावरचे केस गेले, दाढी पांढरी झाली.

माझी केस काय वेगळी आहे का?

ती हसायला लागली खो खो ...

माझं काम झालं होतं.

मी सहजपणे कुणाला तरी आनंद देऊन गेलो होतो.

धोनी गेली अनेक वर्षे तेच तर करत होता.

सव्वासो करोड भारतीयांना आनंद देण्याचे !

मला क्रिकेटच्या आकडेवारीत अजिबात रस नाही. कुणी किती रन्स केल्या, किती विकेट घेतल्या. काय करायचाय असला हिशेब?

आपलं कसं, सगळंच बेहिशेबी !

पण धोनीच्या बाबतीत मी एकच आकडा लक्षात ठेवलाय.

रतन खत्रीच्या मटक्यासारखा, ओपन क्लोज- १

icc क्रिकेटच्या इतिहासातील एकमेव (१) कॅप्टन, ज्याने भारतासाठी सगळ्या ट्रॉफ्या उचलल्यात !

1 नंबर माणूस!!

माही, निवृत्तीनंतरचा तुझा पुढचा वेसुखाचा जावो ह्याच शुभेच्छा ... माही वे

anilbagul1968@gmail.com


खळ्यादार’ कल्याणी

 खळ्यादार’ कल्याणी

ती कॉलेजच्या ऑफिसमध्ये शिरली, की स्टाफची धांदल उडायची.
बापरे ... कल्याणी मॅम आल्या.
मला कळायचे नाही, हे लोक तिला एव्हढे वचकून का राहतात?
मग कुणीतरी सांगितले की तिने सगळ्यामध्ये धाक निर्माण केलाय, ती मॅनेजमेंटची जवळची नातेवाईक आहे म्हणून. आणि तिला वाटलं तर ती तक्रार करू शकते.
बहुधा दहा वर्षे झाली असतील ह्या गोष्टीला.
हा असा 'गाजवे'पणा तिच्यात अगदी ठासून भरलेला.
मनस्वी, स्वछंदी जगण्याची पुरेपूर आवड, त्याला चंचलतेची किनार.
'पॅथॉलॉजी' क्षेत्रातील शिक्षण आणि त्यातील कामाचा प्रदीर्घ अनुभव.
आजच्या 'करोना महामारी'च्या काळात हा अनुभव पणाला लावून आज ती उभी आहे 'कोविड योध्या'च्या रुपात ! महापालिकेच्या 'टेस्टिंग डिपार्टमेंट'मध्ये चाळीसहुन अधिक स्टाफ सोबत ती लढते आहे लढाई !! जीवाची बाजी लावून आपली 'कमिटमेंट' पूर्ण करतांना ती विसरलेली असते घरसंसार.
पण मला खात्री आहे,
कामाच्या धबडग्यात वेळ मिळाला की डबा खातांना ती मनातल्या मनात नक्की गुणगुणत असणार,
‘वारदात’ चित्रपटातल्या, तिच्या आवडत्या गाण्याच्या ओळी...
तू मुझे जानसे भी प्यारा है !
तेरे बीन जग सारा सुना है !
अशा वेळी कपाळावर येणाऱ्या कुरळ्या केसांच्या बटांना दूर सारतांना, गालावरच्या खळ्यांचे सौंदर्य अधिकच खुलत असणार !!
अशा ह्या 'खळ्यादार’ कल्याणीस जन्मदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !!

anilbagul1968@gmail.com




Like
Comment
Share

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...