Showing posts with label हलकं फुलकं. Show all posts
Showing posts with label हलकं फुलकं. Show all posts

Monday 24 September 2018

तुम्हाला आनंद नेमका केव्हा मिळतो ?



विक्रम सरंजामेने विचारलेला प्रश्न थोड्या वेगळ्या स्वरूपात.

हा विक्रम सरंजामे कोण?ते महत्वाचं नाहीये. प्रश्न महत्वाचा आहे. तुम्हाला आनंद नेमका केव्हा मिळतो ?

मलाच उत्तर विचारताय ?
माझं उत्तर सोप्प आहे. माझ्या ह्या पोस्टला भरपूर सारे (सध्या भरपूर सारे असचं म्हणतात. तुमची डिक्शनरी करेक्ट करून घ्या)हा तर माझ्या ह्या पोस्टला, भरपूर सारे लाईक्स मिळाले कि मला आनंद मिळेल.

हा पण तुम्हाला नेमका आनंद केव्हा मिळतो?
'माझ्या नवऱ्याची दुसरी बायको', सिरिअल सुरु झाली कि आनंद - आय मीन - तो गुज्जूभाई मिळतो, असं उत्तर देऊन माती खाऊ नका.

तुम्हाला खोटं वाटेल, पण हा प्रश्न घेऊन मी अनेकांना भेटलो. हाच प्रश्न त्यांना विचारला.

माझी फ्रेंड रिक्वेस्ट तिनी ऍक्सेप्ट केली कि मला आनंद मिळेल, शुभमचं मत.माझा लिव्ह अप्लिकेशन त्या टकलू बॉस ने सॅंक्शन केला का मंग माला आनंद भेटेल, गल्लीतल्या पक्या उर्फ प्रकाशचं मत.मला किनई मी ऑर्डर केलेला बेबी पिंक प्लाझो मिळेल ना तेव्हा किनई खूप खूप आनंद होणार, कॉफीडे मधल्या तनयाचं म्हणणं.
आमच्या ह्या माहेरी जातात तेव्हा आम्हाला नेहमीच आनंद होतो, जॉगिंग ट्रॅकवर चालता चालता जयंतराव बोलले.
होम वर्क ज्यादिवशी खरे मॅम मागतात त्या दिवशी तावडे काका (विनोद नाही फॅक्ट आहे) शाळेला सुट्टी जाहीर करतात टीव्हीवरून, तेव्हा खूप मोठ्ठा सारा आनंद होतो, सिनिअर केजीतल्या आर्या बडबडली.
माझं पोट सकाळी जेव्हा साफ होतं ना त्यावेळी मला खूप हलकं होऊन आनंद मिळतो, इति दामले आजी.

ही यादी मी अजुन वाढवू शकतो.काय? अहो मी भेटलोच आहे तेव्हढ्या लोकांना.पण शेवटची भेट मी घेतली आणि हादरलो.

इथं मुडदा आला की म्या खुस होतुया. पोस्ट मार्टमला मदत करणाऱ्या सिव्हील हॉस्पिटल मधल्या केरू नानाचे उदगार ! अंगावर काटा आला.‘’चपटी भेटतीया. मंग, वरून चकण्याला थोडंफार ! का ना हुईना आनंद मंग ? दिवाळीच कि आपली मंग !’’

मला भ्या वाटलं. पण ... पण ह्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टीतही आनंद मिळतो आणि ते व्यक्त करू शकतात हे महत्वाचे.

असेही काही लोकं पहिली, अनुभवली, की जे विचारात पडले, आनंद केव्हा होतो ह्या प्रश्नाला सामोरे जातांना.

खरं तर आनंद होणं आणि तो व्यक्त होणं हि खूप नैसर्गिक गोष्ट आहे. पण आजकाल सहज साध्या गोष्टींनाचं तुम्ही आम्ही पारखे झालोत. म्हणून गणपतीत एकत्र आलो तरी पूर्वी सारखे पत्त्याचे कॅट बाहेर येत नाहीत. होळीला पूर्वीसारख्या बोंबाही ठोकल्या जात नाहीत की दसऱ्याला आपट्याची पानही द्यायलाही कुणी महाग होऊन जातं.त्यांचं काय ?

ते जाऊदे तुमचं काय?उत्तर हवंय ह्यावेळी मला तुमच्याकडून ! नुसते कोरडे लाईक्स नकोत !!

anilbagul1968@gmail.com

Tuesday 11 September 2018

तुम्हाला आयुष्याचा कंटाळा आलाय का

हो! खरंच विचारतो आहे मी. तुम्हाला आयुष्याचा कंटाळा आलाय का आर्थिक परिस्थितीने तुम्हाला जगणे नकोसे झाले आहे ? किंवा काय किंवा काय ! मग नक्कीच तुम्ही आयुष्य संपवण्याचा प्रयत्न किंवा किमान विचार तरी करत असणार !!

मग तुम्ही थांबा आणि नक्की वाचा ... तुमच्यासाठीच तर लिहितो आहे ना.

झालं असं कि परवाच मी कोकणात गेलो होतो, कामानिमित्त. नाशिकहुन रत्नागिरीला जातांना साहजिकच लागतं बुवा चिपळूण. पण त्या आधी येतो, परशुराम घाट ! घाटातच आहे कि सवतसडा धबधबा. काय हे नाव

पण त्याच्याही आधी साधारण १ कि. मी. आधी, श्रीक्षेत्र परशुराम मंदिर फाटा येतो. आणि तिथेच आपला आजचा हिरो भेटू शकतो तुम्हाला. विश्वास जाधव नाव त्यांच. नावातच विश्वास ... असणारच कि स्वतःवर, नियतीवर आणि पोटच्या पोरांवर देखिल !!




काय करतो विश्वास तिथे

२० x १० ची टपरी चालवतो चहा नाश्त्याची. आणि हो उन्हाळ्यात माझं आवडीचं कोकम सरबत सुद्धा. विश्वास शिकला किती हो ? जेमतेम सातवी नापास ...पण हुशारी बघा. व्यवसायासाठी जागा निवडलीय कोणती ? प्रसिद्ध धबधबयाच्या जवळ... घाटातल्या वळणावर... जिथून खोल दरीतलं अद्भुत सौंदर्याचं दर्शन ... जगबुडी आणि वसिष्ठी नदीचा विलोभनीय संगम अगदी चित्रातल्यासारखा भासतो !

तर हा व्यवहार चतुर विश्वास गेली १७ वर्ष तिथे, न चुकता, न थकता, न कंटाळता करत आलाय व्यवसाय. ह्यात विशेष काय ? तुम्ही विचारलाच ना प्रश्न ?

सातवी नापास विश्वासचा मोठा मुलगा इंजिनीरिंग डिग्री, डिस्टिंगशन मध्ये मिळवून आज M. Tech. करतोय जर्मनीत ! आणि धाकटी मुलगी आहे M. B. B. S. च्या शेवटच्या वर्षाला ! गेली ना तोंडात बोटं !!

हे जेव्हा विश्वास मला अभिमानानं सांगत होता, त्यावेळी तो कर्तव्यपूर्तीच्या पट्टीत समाधानाच्या सुरात गात असावा असाच भास होत होता.
एका वडिलांना आपल्या मुलांच्या उत्कर्षापेक्षा अजून काय हवं असतं ? त्याच्या जिद्दीला माझा सलाम !

तेव्हा नव्याने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. 

म्हणे आलाय जगण्याचा कंटाळा ...

anilbagul1968@gmail.com

गुमशुदा...


गुमशुदाचा डिक्शनरीत अर्थ शोधला ... लापता.

कुणीतरी, कुठूनतरी, कोणापासूनतरी, काही काळासाठी लपण्यासाठी गायब होणं. अर्थात गुमशुदा. 

१० ते ६ अशा रोजच्या रुटीन पासून दूर होत, रोज मराके टेन्शन से दूर, स्वतःला शोधण्यासाठी, भोवतालच्या त्याच त्याच दुनियेपासून जरा हटके, कुछ अलग, जीने का नया अंदाज धुंडने का एक प्रयास.

मग त्यासाठी फक्त हिमालयातच जायची गरज नाही किंवा एखाद्या आश्रमात विपश्यनेला बसण्याचीही गरज नाही. 

तुम्हाला ही गुमशुदा व्हायचंय ?

पहिले बंद करा तुमचा मोबाईल. बाजुला सारा ग्याजेट्झ. बंद करा ते सारे विचार. तोडून द्या सारी बंधने.
टेन्शन लेनेका नही देनेका. जस्ट चेन्ज द अटीट्युड यार. 

थ्री फोर्थ किंवा बर्मुडा आहे ? मग घाला तर. वरून एखादा ढगाळ टीशर्ट चढवला तरी ... चालतंय की ! हॅव्हरसाक मध्ये कोंबा जुजबी कपडे आणि थोड फार सामान आणि सरळ सुटा ...

काय खुणावतंय तुम्हाला ? एखादा किल्ला .. बीच .. 
चलो फिर निकल पडो यारो ! 



मस्त सायकलिंग, एखादं भन्नाट ट्रेकचा थरार, रानमोळं भटकंती काहीही चालतंय. 

नो नीड ऑफ प्लानिंग, बुकिंग, टिकेटिंग, सर्चिंग, गुगलिंग, नो नो नथिंग.
एखादा खळाळता धबधबा, आरस्पानी सौंदर्य असलेला सागर किनारा, आकाशाकडे झेपावणारा डोंगरकडा सारं काही डोळे भरून अनुभवा.
थिंग इज यू मस्ट बी हॅविंग प्याशन टु बी गुमशुदा ...

काय मग होणार ना तुम्ही गुमशुदा ?

anilbagul1968@gmail.com





‘किंगडम ऑफ दीक्षित’




kingdom of dixit

इंदूरमध्ये राहणाऱ्या सुयश दीक्षित ह्या पट्ठ्याने काल कमालच केली. इजिप्त आणि सुदान या देशांच्यामध्ये एक मोकळा प्रदेश आहे, बिर ताविल नावाचा.

हा प्रदेश म्हणजे माझा नवा देश असल्याचे त्याने चक्क घोषित केलं राव ! नावही ठेवलं भाऊंनी ... किंगडम ऑफ दीक्षित. 

असे अनेक अवलिये असतात आजूबाजूला आपल्या. त्यांचे कारनामे सुरु असतात. उजेडात आले की होतो आपण अचंबित !

दिवाळी पूर्वी असाच एक अवलिया उजेडात आला ... प्रसाद निक्ते नाव त्याचं ! 
सह्याद्री आणि सातपुड्याच्या घाटमाथ्यावर ७५ दिवस, १००० कि. मी. एकट्याने पायी चालत होता हा माणूस. 

अमोल यादव नावाच्या अशाच एका अवलियाने इमारतीच्या टेरेस मध्ये विमान बनवलं.असंच कुणी सायकल वरून जगाला प्रदक्षिणा घालू पाहतं, कुणी पाण्यावर योगा करण्याचा विश्वविक्रम करत असतं. काल परवा अमेरिकेत एका भारतीय वंशाच्या शीख आजीने वयाच्या ८० व्या वर्षी कसलीशी म्यॅरेथॉन स्पर्धा जिंकली.

हे असं काही करता येणं किंबहुना असा विचार सुद्धा येणं, ह्याला जातकुळी वेगळीच असावी लागते. अशा लोकांचा डी एन ए काही वेगळाच असतो. 

बाबासाहेब पुरंदरेंचं एक वाक्य आठवतं अशावेळी. 
''वेड लागल्याशिवाय इतिहास घडत नाही, किंबहुना वेडी माणसंच इतिहास घडवतात !''

दुःख तेव्हा होतं जेव्हा आपल्याला असं वेडं होता येत नाही ही जाणीव होते आणि आपला खुजेपणा उघडा पडतो त्यावेळी. 

तरीही जगभरातल्या अश्या वेड्यांना माझा दिलसे सलाम !

''किंगडम ऑफ दीक्षित'' कि जय हो !!

anilbagul1968@gmail.com




विदर्भ एक्सप्रेस सुसाट !

            https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2019/10/pjimage-7-380x214.jpg

आमचा मिहान प्रकल्प पुढच्या वर्षी टेक ऑफ करणार ... समृद्धी मार्ग आम्हाला सहा तासांत मुंबईशी जोडणार !

आमचे ''नितीन भौ '' आणून राहिले ना विदर्भात पैशे ... अबब ! किती ? त्यांचे आकडे समजायला कुठे येतात भाऊ ?

बोन्डआळी प्रश्न ... घोड्यावरून पाहणी झटपट. झाला निधी मंजूर. तुम्ही करत बसा द्राक्ष पिकाच्या नुकसानीचे पंचनामे.

विदर्भाच्या पोट्ट्यानी कमाल केली. रणजी क्रिकेट करंडकाच्या इतिहासात पहिल्यांदा नावलिवलं ना बे !

'अध्यक्ष महाराज', पासष्ठ वर्षांचा ब्याकलॉग भरून काढला आम्ही एका झटक्यात !! अध्यक्ष महाराज हा ब्याकलॉग हे आघाडी सरकारचं पाप होतं. आम्ही ते दोन वर्षात धुऊन काढलं, अध्यक्ष महाराज.

तुमच्या पुण्याच्या आधी आमच्या नागपुरात मेट्रो धावणार ... पुणेकर बापट-चापट ''काकड'' आरतीत दंग. 

इ-रिक्षा नागपुरात सुरु देखिल झाल्या.. पतंजलीची संत्रा ज्यूस फॅक्टरी विदर्भात सुरु होणारतुम्ही बसा रोज सकाळी फास - फूस करत. हा तेच ते कपालभारती वगैरे करत.

नाशिकचा एकलहरे विदयुत प्रकल्पाचा धूर कोळश्या अभावी बंद होऊ राहिला. आमच्या सुधीर भाऊंच्या चंद्रपुरात कोळश्याला कमी नाही. तसं आम्हाला कशाचीच कमी नाही म्हणून राहिले की लोक बाप्पा !

कर्जमाफी झाली. सर्वात जास्तीचा आकडा आमच्या ''यवतमाळ''चाच. 

'अध्यक्ष महाराज', वेगळा विदर्भ वेगळा विदर्भ, बोबलून राहिले होते तेव्हा ''धोटे'' आणि आता आमचेच ''अणे''. 

मी म्हणतो वेगळ्या विदर्भाची गरजच काय राहिली आता बे ? आमची विदर्भ विकासाची एक्सप्रेस सुसाट धावू राहिली ना भौ !

क्राईम-बीईम , खून-बिनाचं बोलू नका राव. मुंबईत तर किड्यामुंग्यासारखे रोज लोक मरू राहिलेत ना. मंग ?

तुम्ही बसा कुटत रडगाणी, तुमच्या नवऱ्याच्या पहिल्या बायको सारखी. ''माझ्या नवऱ्याची दुसरी बायको'' सिरिअल पण जोरात चालू आहे ना बे, भैताडांनो !!

anilbagul1968@gmail.com


वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...