रविवारच्या सकाळी नेहमीप्रमाणे मोरू अंथरुणात लोळत पडला होता. मोरूच्या लाथांनी पांघरून चोळामोळा होऊन पलंगाच्या खाली केव्हाच पडले होते. उशाशी ठेवलेला चष्मा, फ़ुटबाँलची किक मिळाल्यासारखा लांब फेकला गेला होता. तर मोबाईलचा अलार्म त्याला जागे करण्याचा कसोशीने प्रयत्न करू पाहत होता.
त्याचा तो गबाळा अवतार पाहून मिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती मोठ्यांदा
किंचाळली,
''अहो उठा, आज तरी उठा लवकर !'' तिच्या त्या तारस्वरातील आवाजाने किंचितसं दचकल्यासारखे करत मोरू पुटपुटला. मीने अगं
मीने,
आज तरी झोपू दे. आज रविवार आहे.
त्याचे ते बोल ऐकून मिनीने एव्हाना रुद्रावतार धारण केला.
अरे मोऱ्या उठ, आज पाडवा आहे पाडवा ! हिंदू नववर्ष दिन !! ह्यामेल्यावर
आईबापांनी
काही संस्कार म्हणून केले नाहीत. आईबापाचा उद्धार मिनीच्या तोंडून ऐकल्यामुळे नाईलाजाने मोरूने एकदाचे डोळे उघडले. मोबाईल मधला अलार्म बंद केला. आळोखे पिळोखे देत स्वारी पलंगाबाहेर आली.
अरे, जरा उठून अंघोळीपांघोळ करून घरा बाहेर पड. चारचौघात मिसळ. सगळीकडंच वातावरण बघ कसं आनंदाचं, उत्साहाचं आहे. सगळीकडे रांगोळ्या , पताका अशी सजावट. नऊवारी नेसून, भगवे फेटे घालून महिला आणि भगवे झेंडे नाचवत , सोनेरी झब्बे, कोल्हापुरी चपला घातलेले पुरुष. शिवगर्जना, नवक्रांती, भवानी, तालरूद्र अशी ढोलपथकं. लेझीम पथकं, आदिवासी नृत्य पथकं अशी सारीजण
सज्ज
झाली आहे. आता 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' सुरु होईल ! आहे किनई मज्जा ?
बाथरूममध्ये गार पाण्याचे तांबे घाईघाईने अंगावर ओततांना मोरूला मिनीची ही कॉमेंट्री ऐकू येत होती. एकदाची अंघोळ उरकून, खसाखस टॉवेलला अंग पुसत मोरू बाहेर आला. मिनीने नवाकोरा अबोली रंगाचा झब्बा आणि पांढरी सुरवार
त्याच्यापुढे
धरली. मोठ्या ऐटीने ते अंगावर चढवत , पायात नव्याकोऱ्या ‘कोल्हापुरी’ घालून मोरू सोसायटीच्या गेट बाहेर पडला.
अंदाजे एक प्रहाराने मोरूराजे आपल्या राजवाड्याच्या दिशेने परत आले. ते आल्याची खबर 'अलार्म' दासीने राणी मिनीताई राजेंना दिली. हातातील प्लास्टिक पिशवीतील नजराणा राजेंनी राणीकडे सुपूर्त केला. मुदपाकखान्यात ताटे करण्याची खबर गेली. राजा राणीने पाडव्याच्या खास शाही भोजनाचा आस्वाद घेतला. यंदाचे 'चितळेंकडचे' श्रीखंड फारच उत्तम होते. वेलदोडे, केशर आणि ‘जि एस टी.’ छान चव जमून आली होती.
तब्येतीत जेवण झाल्याने राजा राणींना झोप अनावर झाली, अन दोघेही निद्रादेवीच्या स्वाधीन झाले.
एव्हढ्या सगळ्या गडबडीत ते गुढी वगैरे उभाराचे राहून गेले वाटतं !!
anilbagul1968@gmail.com
त्याचा तो गबाळा अवतार पाहून मिनीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि ती मोठ्यांदा
किंचाळली,
''अहो उठा, आज तरी उठा लवकर !'' तिच्या त्या तारस्वरातील आवाजाने किंचितसं दचकल्यासारखे करत मोरू पुटपुटला. मीने अगं
मीने,
आज तरी झोपू दे. आज रविवार आहे.
अरे, जरा उठून अंघोळीपांघोळ करून घरा बाहेर पड. चारचौघात मिसळ. सगळीकडंच वातावरण बघ कसं आनंदाचं, उत्साहाचं आहे. सगळीकडे रांगोळ्या , पताका अशी सजावट. नऊवारी नेसून, भगवे फेटे घालून महिला आणि भगवे झेंडे नाचवत , सोनेरी झब्बे, कोल्हापुरी चपला घातलेले पुरुष. शिवगर्जना, नवक्रांती, भवानी, तालरूद्र अशी ढोलपथकं. लेझीम पथकं, आदिवासी नृत्य पथकं अशी सारीजण
सज्ज
झाली आहे. आता 'हिंदू नववर्ष स्वागत यात्रा' सुरु होईल ! आहे किनई मज्जा ?
बाथरूममध्ये गार पाण्याचे तांबे घाईघाईने अंगावर ओततांना मोरूला मिनीची ही कॉमेंट्री ऐकू येत होती. एकदाची अंघोळ उरकून, खसाखस टॉवेलला अंग पुसत मोरू बाहेर आला. मिनीने नवाकोरा अबोली रंगाचा झब्बा आणि पांढरी सुरवार
त्याच्यापुढे
धरली. मोठ्या ऐटीने ते अंगावर चढवत , पायात नव्याकोऱ्या ‘कोल्हापुरी’ घालून मोरू सोसायटीच्या गेट बाहेर पडला.
अंदाजे एक प्रहाराने मोरूराजे आपल्या राजवाड्याच्या दिशेने परत आले. ते आल्याची खबर 'अलार्म' दासीने राणी मिनीताई राजेंना दिली. हातातील प्लास्टिक पिशवीतील नजराणा राजेंनी राणीकडे सुपूर्त केला. मुदपाकखान्यात ताटे करण्याची खबर गेली. राजा राणीने पाडव्याच्या खास शाही भोजनाचा आस्वाद घेतला. यंदाचे 'चितळेंकडचे' श्रीखंड फारच उत्तम होते. वेलदोडे, केशर आणि ‘जि एस टी.’ छान चव जमून आली होती.
एव्हढ्या सगळ्या गडबडीत ते गुढी वगैरे उभाराचे राहून गेले वाटतं !!

No comments:
Post a Comment