Wednesday 9 August 2017

पडद्याआडचे बुरखे

https://www.google.com/url?sa=i&url=https%3A%2F%2Fwww.telegraph.co.uk%2Fnews%2F2016%2F07%2F07%2Fburka-ban-for-muslims-enforced-in-switzerland-with-fines-of-up-t%2F&psig=AOvVaw1knwEvoYLZ36OyczT-Q_Hm&ust=1618138635541000&source=images&cd=vfe&ved=2ahUKEwit9OilwvPvAhVstUsFHZUYAdkQr4kDegUIARCMAg
https://www.google.com/url?

गप्पा तर खूप मारतो आपण स्त्री -पुरुष समानतेच्या. पुरुषांच्या बरोबरीने महिला आता काम करू लागल्यात. काही क्षेत्रात तर त्या पुढे गेल्यात वगैरे वगैरे . एक छान आभासी चित्र आपण रंगवलंय, आपल्याच समाधानासाठी. मग माध्यमं उडवत राहतात त्याचे रंगेबिरंगी फुगे वेगवेगळे 'डेसाजरे करण्यासाठी. एखाद्या क्षणी, प्रखर वास्तवाची पिन टोचली की टचकन फुटतो त्यातलाच एखादा फुगा, जळजळीत सत्याची हवा बाहेर टाकून.

फार लांबचं कशाला अगदी काल परवाचा आजूबाजूला घडलेला प्रसंग आहे. एका प्रसिद्ध वृत्तपत्राची तितकीच प्रसिद्ध 'सौंदर्य स्पर्धा' सध्या नाशकात सुरु आहे. 'ग्रँड फिनाले'साठी चुरस रंगलीय. स्पर्धेतल्या प्रत्येकीचे आकर्षक फोटो त्या वृत्तपत्रात झळकतायत. स्पर्धा जिंकण्यासाठी निवड झालेल्या त्या सगळ्या जणी आता जीवाची बाजी लावतील. स्पर्धा जिंकून पुढे 'बॉलिवूड' प्रवेशाची स्वप्नही त्यांना एव्हाना पडू लागली असतील. पण त्यातलीच एक जण सोडून....

हो त्यातलीच एक जण सोडून.... कारण ती आता त्या स्पर्धेत नाही आहे. स्पर्धा संपण्यापूर्वीच तिला बाद केलं गेलंय. स्वप्न बघण्याचा तिचा हक्कच काढून घेतला गेलाय.

नाही नाही तिला नापास करणारे स्पर्धेचे परीक्षक नाहीत, आयोजक देखील नाहीत. हे पुण्याचं काम केलंय तिच्याच नातेवाईकांनी. समाज, रीतभात, बाईपण ... कसले कसले दोर बांधले त्यांनी तिच्या स्वप्नांच्या पंखांनाजातीबाहेर होण्याच्या भीतीने मग तिच्या जन्मदात्यांनीच आणखी कसले ते दोरआता तिच्या नशिबी  पडद्याआडचा बुरखाच, 'डिझायनर कास्च्युम' ऐवजी  ! जात पंचायतीने  आखून दिलेल्या वाटेवर 'कॅट वॉक' करण्यासाठी !!

स्त्री जन्माचा आकडा आताशा वाढू लागलाय. 'सॅनिटरी न्यापकीन' पुरवणारी यंत्रे कॉलेजांत बसवू लागली आहेत. त्याच बरोबरीने बुरखे देखिल पुरवावे लागणार आहेत, हे ध्यानी असू द्यावं म्हणजे झालं. तुमच्याच मुलींना लागणार आहेत, चेहरे झाकण्यासाठी !

anilbagul1968@gmail.com

No comments:

Post a Comment

वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक

  वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्‍या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी...   ' ...