वेगवेगळ्या ठिकाणी फिरतांना, वेगवेगळ्या लोकांना जाणून घेतांना, वेगवेगळ्या अनुभवांना सामोरे जातांना, वेगवेगळ्या क्षणी, उत्स्फूर्त सुचलेले वेगवेगळे विचार, वेधक शब्दांत मांडण्याचा वेगळा प्रयत्न ! इथं प्रवासवर्णन आहे, व्यक्तीचित्रण आहे, तिरकस मारलेले टप्पे आहेत. चित्रपट गीतांचा घेतलेला आस्वाद आहे. कविता देखिल आहेत. ही अशी सगळी विचारांची, भाव-भावनांची झिम्माड गर्दी ! आपण नक्की वाचा. प्रतिक्रिया द्या. सुचनाही हक्काने सांगा.
Monday 13 June 2016
BACK UP
'validity' संपलीय 'relation' च्या 'software' ची,
आठवणींच्या 'files delete' होत आहेत.
जुनंच 'version' नव्याने 'Install' करावं की,
'program' चं सगळा change करायचा ?
हा 'dilemma' आता संपवावा लागणार आहे.
आपणच 'outdated' होण्यापूर्वी.
एक मात्र नक्की करायचं....
अनुभवाचा 'backup' तेव्हढा ठेवायचा.
anilbagul1968@gmail.com
कविता
ऐन तारुण्यात कविता करू पहात होतो,
शब्दांचे फुलोरे फुलवू बघत होतो.
शब्दांच्या मेळात अर्थ निसटून जात होता,
अर्थाच्या गवसणीत शब्द सांडून जात होते.
ज्येष्ठ कवी म्हणाले अक्षरा मधे जीव ओत,
भावनांचा ओलावा शिंपडायला शीक.
प्रेमाचा बगिचा फुलव, मग बघ जादू,
शब्दांचा पाऊस आणि कवितेच भरघोस पीक !
प्रेमाच्या झुल्यावर कविता झोके घेऊ लागली,
स्वप्नाच्या जगात मग हिंडू फिरू लागली.
प्रेमाला मग धुंद प्रणयाचा बहर आला,
अन कवितेला जणू मोगऱ्याचा सुवास आला.
आयुष्याच्या वळणावर वास्तवाची ठेच लागली,
अनुभवाच्या धारदार शस्त्रनि कविता घायाळ झाली.
दुखाच्या आवेगानी अश्रूंचा बांध पुरता फुटला,
वेदनाच्या आर्त कळान्तून विरहगीत प्रसवून गेला.
anilbagul1968@gmail.com
कुंडली
आयुष्यातले हिशेब चुकते करीत गेलो
जमा थोडे बाकी उणेच मांडीत गेलो
यशाच्या सोंगट्या दूरदेशी राहिल्या
नशिबाचे पत्ते फक्त पिसत बसलो
नवे नवे घाव झेलीता झेलीता
जुन्याच जखमा मोजीत रमलो
मरणाच्या दारात डोकावीत असता
सरणाचे देणे मात्र फेडीत राहीलो
आता उरलो केवळ शुन्य भूतकाळापुरता
वर्तमानाचा अद्याप पत्ताच नाही ठरला
भविष्याचे काय म्हणुनी काय पुसता
फकीराची कोणी कधी कुंडली मांडीता?
नवे नवे घाव झेलीता झेलीता
जुन्याच जखमा मोजीत रमलो
मरणाच्या दारात डोकावीत असता
सरणाचे देणे मात्र फेडीत राहीलो
आता उरलो केवळ शुन्य भूतकाळापुरता
वर्तमानाचा अद्याप पत्ताच नाही ठरला
भविष्याचे काय म्हणुनी काय पुसता
फकीराची कोणी कधी कुंडली मांडीता?
anilbagul1968@gmail.com
Subscribe to:
Posts (Atom)
वृत्तपत्र विक्रेता ते उद्योजक
वृत्तपत्र विक्रेता म्हणून कार्य करत जिद्दीने शिक्षण घेऊन स्वतःच्या संस्थेची उभारणी करणार्या नाशिकच्या अनिल बागुल यांच्याविषयी... ' ...
-
पूर्वी म्हणजे गोऱ्या साहेबांचं राज्य असतांना , साहेबांना हिंदुस्तानातला उन्हाळा सहन होत नसे . म्हणून त्यांनी इथं उन्हाळ्यात ...
-
मध्य केरळमधील कुठलंसं गाव. उंचावर वसलेलं. छोट्या छोट्या टेकड्यांनी सजलेलं. नागमोडी रस्त्यानी नटलेलं. टेकड्यांनी हिरव्याशार दुलईचे पांघरूण लप...
-
गोदातीरी भगव्या संध्याकाळी कामांध वासनांचा भोग चढतो आहे आणि उगवणारा प्रत्येक प्रहर साधु महंतांचा क्रोध झेलतो आहे सत्तेच्या दिखाऊ दिवाण...